आशिष नागपुरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
8

गोंदिया,दि.२८-भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सदस्य राहिलेले आशिष गिरजाशंकरसिंह नागपुरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २६ फेबुवारीला प्रवेश केला. नागपुरे यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना डावलण्यात आले होते. तेव्हापासून ते पक्षातून दूर होते. नाना पटोले काँग्रेसमध्ये परत आल्यानंतर त्यांना संधी असतानाही त्यांनी मात्र काँग्रेस पटोलेंच्या प्रवेशानंतर सोडल्याने चर्चांना उधाण आले आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन सक्रिय राजकारणात पुन्हा नागपुरे परतले आहेत. खासदार पटेल यांनी नागपुरे यांचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत केले. यावेळी गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष छोटू पटले, जिलाध्यक्ष विनोद हरिणखेडे, माजी आमदार राजेंद्र जैन, कुंदन कटारे, गप्पू गुप्ता उपस्थित होते.