वाशिम येथे प्रा. डॉ. सुषमा अंधारे यांचे व्याख्यान आज

0
162
आकाश पडघन
वाशीम -दि.3ः भीम आर्मी एकता मिशनच्या वतीने आज शनिवार 3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता स्थानिक नालंदानगर मैदानात महिला  आरक्षण व भारतीय समाज व्यवस्थेतील आरक्षण आणि भ्रम व वास्तव या विषयावर बहुजन विचारवंत  प्रा. डॉ. सुषमा अंधारे यांच्या जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील विचारवंत व नागरीकांनी बहूसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घेेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक व भीम आर्मी एकता मिशनचे विदर्भ प्रदेश प्रमुख अ‍ॅड. सचिन पट्टेबहादूर यांनी केले आहे.
 कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालय दिल्लीचे विधीज्ञ डॉ. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. नितीन सातपुते, अ‍ॅड. विजय पट्टेबहादूर यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी भिम आर्मीचे प्रदेश प्रमुख अशोक कांबळे हे राहतील. भारिपचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजाणी, डॉ. नरेश इंगळे, अ‍ॅड. पी.व्ही. इंगळे, मोतीराम राऊत, न.प. सदस्य बबलुभाई, डॉ. तुषार गायकवाड, अ‍ॅड. जहीर शेख, भुषण मोरे, सोनाजी इंगळे, विनोद पट्टेबहादूर हे पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय मनवर, नोटरी अ‍ॅड. मोहन गवई, अ‍ॅड. विशाल सावंत, प्रमोद सावळे हे राहतील. सामाजीक कार्यकर्ता राम बाजड, लहुजी शक्ती सेना जिल्हा प्रभारी मोहनराज दुतोंडे, संतोष सरकटे, राहुल मनवर, महादेव धवसे आदी मान्यवरांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहील.या व्याख्यान कार्यक्रमाला नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यान कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भिम आर्मी वाशिम  च्या सर्व सदस्य , पदाधिकाऱ्यांनी केले.