डॉ. कटरे सीसीएमपी परिक्षेत उत्तीर्ण

0
13
आमगाव,दि.3ः- शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना गेल्या २९ वर्षापासून वैद्यकीय सेवा देणारे येथील जनरल फिजिशियन जामखारीचे डॉ. टी. डी. कटरे यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ नाशिकद्वारा संचालित वैद्यकीय शास्त्रातील मान्यताप्राप्त मॉडर्न फार्माकॉलाजी (सीसीएमपी) परिक्षेमध्ये संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात एकमेव स्थान प्राप्त केले आहे. ही परीक्षा इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या केंद्रातून औषधशास्त्री विषयातून घेतली गेली. यामध्ये संपूर्ण गोंदिया जिल्हामधून पाच लोकांनी सहभाग घेतला असून या परिक्षेत केवळ सिनियर डॉ. कटरे यशस्वी झाले. तसेच शिकण्या आड वय येत नाही. याचे उत्तम उदाहरण पटवून दिले, हे उल्लेखनीय आहे.
डॉ. टी.डी. कटरे गोंदिया मार्ग आमगाव येथे तिरूपती उपचार केंद्र या नावाने क्लिनीक वर्ष १९८९ पासून चालवत असून ग्रामीण तसेच शहरी रुग्णांची निरंतर सेवा करत आहेत. सिनियर डॉ. कटरे बीएचएमएस ची पदवी प्राप्त करून मागील १२ वर्षापासून सेंट्रल हॉस्पीटल एलएम बजाज गोंदिया येथे असिस्टंट डॉक्टर या पदावर कार्यरत असून श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर इंस्टीट्यूट ऑफ फॉमसी आमगाव या कॉलजमध्ये मागील २ वर्षापासून गेस्ट लेक्चरच्या रुपाने सेवा देत आहेत. शासनाने २०१६ साली वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मॉडर्न फार्मकॉलॉजी या अभ्यासक्रमाला मान्यता दिली. या अभ्याक्रमासाठी डॉ. कटरे यांनी एवढ्या जबाबदाèया पार पाडत असताना देखील वेळ काढून गांभीर्याने अभ्यास करीत परीक्षा देऊन उत्तीण होवून यश प्राप्त केले. हे कौतुकास्पद आहे. तर्वव्यनिष्ठ तसेच मृदू स्वभावी डॉ. कटरे यांच्या अफाट यशाबद्दल सर्वत्र कौतुक करीत केशरीचंद सेठीया, रामqसह चव्हाण, इसुलाल भालेकर, क्रांताप्रसाद मिश्रा, रितेश अग्रवाल आदींनी शुभेच्छा दिल्या.