स्वयम प्रकल्पातून बालमृत्यूला आळा

0
12

अर्जुनी मोरगाव,दि.06 : कुपोषण व उपजत बालमृत्यूला आळा बसावा. तसेच लाभार्थी गटातील महिलांचा आर्थिक दर्जा उंचवावा या उद्देशाने उमेदच्या माध्यमातून भरनोली येथे स्वयम प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्यामुळे बालमृत्यूला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे उमेदच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुपोषण, महिला सबलीकरण व उद्योजगता या मुख्य उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून भरनोली येथे स्थापन करण्यात येणाऱ्या स्वयम प्रकल्पाचे (मदर युनिट) भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शनिवारी (दि.३) पार पडले.
याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, माजी सभापती प्रकाश गहाणे, पं.स. सदस्य रामलाल मुंगणकर, तानाजी ताराम, जिल्हा अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे, तालुका व्यवस्थापक रेशिम नेवारे, प्रभाग समन्वयक भावे, ग्रामसंघाचे अध्यक्ष जमदाळ, सरपंच प्रमिला कोरामी उपस्थित होते.
महिलांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी गटाच्या माध्यमातून एकत्र यावे. बचय गटातील महिलांच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचे या वेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक (उमेद) प्रविण भांडारकर यांनी मांडले.