संतांचे विचार व प्रतिमा प्रेरक – आ.रहागंडाले

0
28

गोरेगाव,दि.15ः-संताचे विचार हे उच्च कोटींचे असतात. जनकल्याण व मानव जातीच्या उत्थानासाठी संत स्वत:ला विसरून आपले आयुष्य पणाला लावून कार्य करतात. मानव जातीच्या उत्थानासाठी संताचे विचार व प्रतिमा प्रेरक ठरतात असे मत तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनी व्यक्त केले.
ते श्रीरामपूर गोरेगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रतिमेचे अनावरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचा अनावरण सोहळा आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती विश्वजित डोंगरे,भाजप तालुकाध्यक्ष डाॅ.लक्ष्मण भगत, नगरसेवक सुरेंद्र पटले, मार्गदर्शक म्हणून जे. डी. जगणित गुरूजी, न. प. सदस्य हिरा रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते रोहिदास यांच्या प्रतिमेचे अनावरण करून पूजन व माल्यार्पण करण्यात आले.पुढे बोलतांना आ.रहागंडाले म्हणाले की, पुज्यनिय संत रोहिदास महाराजांनी चांभार समाजात जन्म घेतला असला तरी त्यांचे मानव सेवेचे कार्य व सद्विचाराने चालणारा व्यक्ती कधीच मागे राहू शकत नाही.
पारंपरिक अनिष्ठ प्रथांना मोडीत काढून त्यांनी समाजात जनजागृती केली व पुज्यनिय संत स्थान प्राप्त म्हणून आज आपण त्यांची प्राण प्रतिष्ठ करून त्यांना सर्वजन वंदन करतो. असे सांगत आ. रहांगडाले यांनी जात, धर्म, विसरून मानव जातीच्या सेवेसाठी तत्पर राहावे असा संदेश आपल्या भाषणातून दिला. यावेळी बोलतांना जे.डी.जगणित गुरुजी म्हणाले की, जाती, धर्म व पैशाने माणूस कधीच मोठा होत नाही. मानसाने सदविचार, सद्भावना व सतकमार्ने माणूस मोठा होतो व असे विचार संत जातपात व धर्म विसरून सर्व मानव जातीला देव असतात. त्यामुळे संताची महिमा न्यारी असते. त्यांच्या प्रतिमा पुज्यनीय असतात. म्हणून अनंत काळापर्यंत त्यांच्या प्रतिमा व विचार हे जनामनात रुजवले जातात. उपस्थित मान्यवरांनी देखील समयोचित मार्गदर्शन करून संतांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी भक्तांनी सहकार्य केले.