26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ कॅन्सरग्रस्त रुग्णांना धनादेश वाटप

कॅन्सरग्रस्त रुग्णांना धनादेश वाटप

0
39

अर्जुनी मोरगाव,दि.23ः तालुक्यातील विहिरगाव/बड्या येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाला जिल्हा निधी आरोग्य विभाग जिल्हा परिषदेकडून मंजूर झालेला १५ हजार रुपयांचा धनादेश पंचायत समिती सभापती कक्षात सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त, किडनीग्रस्त, हृदयविकार व मेंदूविकार अशा रुग्णांना जिल्हा परिषद गोंदियाच्या जिल्हा निधीमधून १५ हजारांची आर्थिक मदत औषध उपचारासाठी देण्यात येते. ‘त्या’ अंतर्गत अर्जुनी-मोर तालुक्यातील विहिरगाव/बड्या येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण ताराचंद भीमाजी बडोले यांना पंधरा हजारांचा धनादेश सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी एच. के. नेताम, चौधरी व आरोग्य सेवक झोळे उपस्थित होते. जिल्हा परिषद गोंदियामधून लाभार्थ्याला आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी सभापती शिवणकर यांनी विशेष प्रयत्न केले. १५ हजारांच्या आर्थिक मदतीमुळे कॅन्सरग्रस्त ताराचंद बडोले यांनी समाधान व्यक्त केले.