आमगावखुर्दला नगरपंचायतमध्ये समाविष्ठ करा,आंदोलकाची प्रकृती खालावली

0
8

सालेकसा(मनोज डोये),दि.२५ : आमगाव खुर्द ग्रामपंचायतचा सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश करण्यात यावा. या मागणीला घेवून मागील २५ दिवासापासून सुरु असलेल्या आमरण उपोषणातंर्गत साखळी उपोषणाच्या ५ व्या दिवशी आंदोलनकत्र्यांची प्रकृती खालावल्याने शनिवारच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.गेल्या २५ दिवसापासून हे आंदोलन सुरु असतानाही जिल्हाप्रशासनासह एकाही लोकप्रतिनिधीने या आंदोलनाची न घेतलेली दखल व विधानमंडळच्या सत्रातही एकाही आमदाराने यावर न विचारलेला प्रश्न या आंदोलकांच्याच नव्हे तर ज्या जनतेने हे आंदोलन पुकारले आहे,त्या जनतेच्या विचारांचीच गळचेपी करण्याचा प्रयत्न विद्यमाम सरकारकडून चालिवल्याचे दिसून येत आहे.
सालेकसा नगरपंचायत मध्ये विलीनीकरण साठी आमगाव खुर्द ग्रामवासीयांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा २५ व्या दिवशी २४ मार्चला ३ उपोषणकत्र्यांपैकी तेजराम चौरे यांची प्रकृती खालावल्याने रात्रीलाचा पोलीस निरिक्षक व तहसिलदारांच्या उपस्थितीत रुग्णालया दाखल करण्यात आले.चौरे यांच्या रक्तसाठात साखरेचे प्रमाण अधिक आढळल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.चौरे यांची प्रकृती खालावल्याची माहिती पसरताच नागरिकांत असतोंष उफाळला असून नगरपंचायतमध्ये सहभागाला घेऊन विरोध करणाèया सत्ताधारी पक्षाच्या सर्वच लोकप्रतिनिधींसह त्यांच्या समर्थकांचा निषेध नोंदविण्यात येत आहे.