रेल्वे ओळखपत्रासाठी दिव्यांगांची वरठी स्थानकावर गर्दी

0
17
दिव्यांगांनी मानले शिशुपाल पटलेंचे आभार
तुमसर,दि.25ः- दिव्यांग प्रवाशांना रेल्वेची पास काढण्यासाठी नागपुरला जावे लागत होते. माजी खा. शिशुपाल पटले यांच्या पाठपुराव्यामुळे दि. २४ मार्च रोजी वरठी रेल्वे स्थानकावर विशेष शिबिर लावुन दिव्यांगांना रेल्वे प्रवासासाठी ओळखपत्र देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील दिव्यांगांनी प्रचंड गर्दी केली होती. ज्यांची नोंदणी होउâ शकली नाही, अशांसाठी सोमवार दि. २६ मार्च रोजी पुन्हा हे शिबीर लावण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील दिव्यांगांना भेडसावत असलेल्या व त्रासदायक ठरत असलेल्या विविध समस्या मार्गी लागाव्या, यासाठी भंडारा जिल्हा दिव्यांग संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन माजी खा. शिशुपाल पटले यांना  १८ जानेवारी रोजी भंडारा येथील विश्रामगृहात दिले होते.
दिव्यांगांना रेल्वे ओळखपत्राकरिता नागपुरला जावे लागत होते. यात दिव्यांगांना बराच मनस्ताप सहन करावा लागत होता तसेच त्यांचा वेळ व पैसा खर्ची होत होता . त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी ओळखपत्र देण्याची व्यवस्था जिल्हा पातळीवर करण्यात यावी.  दिव्यांगांच्या या निवेदनाची दखल घेत माजी खा. शिशुपाल पटले यांनी २ मार्च रोजी रेल्वेचे एडीआरएम बी. के. राथ व सीनीयर डीसीएम अर्जुन सिब्बल यांची भेट घेतल्यानंतर  येत्या २४ मार्चला विशेष शिबिर लावून दिव्यांगांना रेल्वे ओळखपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तात्काळ अंमलबजावणी करीत रेल्वे प्रशासनातर्पेâ वरठी रेल्वे स्थानकावर दिव्यांगांना रेल्वे ओळखपत्र देण्यासबंधी नोंदणी करण्यात आली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७०० दिव्यांगांची नोंदणी झाली असुन १५०० पेक्षा अधिक दिव्यांगांनी गर्दी केली होती. ज्यांची नोंदणी होऊ शकली नाही, त्यांना सोमवार २६ मार्चला बोलविण्यात आले आहे. दिव्यांग संघटनेचे  जिल्हाध्यक्ष अशोकला चौधरी, सचीव विकास चाचीरे, महासचिव नरेश लांजे, कोषाध्यक्ष पवन रहांगडाले, उपाध्यक्ष निलेश धांडे, आदींनी रेल्वे प्रशासनाचे व माजी खा. शिशुपाल पटले यांचे आभार मानले.