23.2 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home विदर्भ चुलोदच्या तलाठ्याला विट्टाभटीचालकाची मारहाण

चुलोदच्या तलाठ्याला विट्टाभटीचालकाची मारहाण

0
30

गोंदिया,दि.२८ :गोंदिया उपविभागीय कार्यालयातंर्गत येत असलेल्या चुलोद येथील तलाठयाला शासकीय काम करीत असताना टेमणीनिवासी विट्टाभट्टीचालक नरेश प्रजापती यांनी मारहाण केल्याची घटना आज बुधवारला घडली.याप्रकरणात दोषीवर त्वरीत कारवाई करण्यासंबधी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आहे.त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर करुन घटनेचा निषेध तलाठी संघटनेच्यावतीने नोंदविण्यात आले आहे.

चुलोद येथील तलाठी अनिल गोविदचंद डेकाटे हे शासकीय कामानिमत्त विट्टभट्टी दंडाचे आदेश तामील करण्यासाठी टेमनी येथील नरेश रामाजी प्रजापती रा.पिडकेपार यांंच्याकडे गेले असता त्यांनी गैरवर्तणूक करुन नोटिस फाडत तलाठ्याला मारहाण करीत कपडे फाडले तसेच तलाठ्याच्या मोबाईलही फोडल्याने तलाठी संवर्गात असंतोष उफाळून आला आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर तहसिलदार यांनी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनला तत्काळ गुन्हा नोंदविण्यासंबधी केलेल्या सुचनेनुसार तलाठी डेकाटे यांनी तक्रार नोंदविली असून जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही,तोपर्यंत तलाठी वसुलीची कामे करणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी तलाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.