सरपंच ग्रामसेवक संयुक्त समन्वय मेळावा अभिनव उपक्रम यशस्वी

0
14

गोंदिया,दि.23ः-महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन  डी. एन.ई.१३६ जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांचे संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच संघटने मार्फत सरपंच ग्रामसेवक संयुक्त समन्वय मेळावा मयूर लॉन गोंदिया येथे यशस्वीरीत्या पार पड़ला.या समन्वय मेळाव्यात पंचायत राज संस्था अधिक बळकट करून अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कमी करून अधिक विकेंद्रीतरीत्या पारदर्शक विकास साधण्याचा संकल्प करण्यात आला.सोबतच सरपंचांना १०००० मानधन व १००० रुपये सदस्याला बैठक भत्ता देण्यासाठी शासनाकडे मागणी पाठविण्याचा ठराव पारित करण्यात आला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे होते.तर उदघाटक म्हणून अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष उमेशश्चंद्र चिलबुले उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून राज्य सरचिटणीस प्रशांत जामोडे, राज्य कोषाध्यक्ष निकम साहेब, उपाध्यक्ष मीनाक्षी बन्सोड, सरपंच संघटना अध्यक्ष भगत,सचिव येरने ,ग्रामसेवक संघटना गोंदिया मानद अध्यक्ष कार्तिक चौहान, जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, राज्य संघटक विलास खोब्रागडे, विभागीय सचिव कोल्हे,उपाध्यक्ष भांडेकर, अमरावती सचिव भागवत,गडचिरोली सचिव पटले,विदर्भ आघाडी खांदेवले,जिल्हा सचिव फटींग, उपाध्यक्ष सचिन कुथे,कोषाध्यक्ष लक्ष्मण ठाकरे,महिला उपाध्यक्ष बागडे,वाढई, पदाधिकारी ओ.जी.बिसेन,सुरेश वाघमारे,रामा जमाईवर,भागेश चौहान,ओ.के.रहांगडाले,सुनील पटले,सुभाष सिरसाट, हरिनखेडे, पारधी,नेवारे ,सर्व सरपंच संघटना तालुका अध्यक्ष सचिव ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्ष सचिव प्रामुख्याने उपस्थित होते

यावेळी सरपंच व सचिव यांच्या संयुक्त बैठकीचे मुख्य प्रायोजन हे एकत्र विचार करुन गावाचा विकास कसा करता येईल हे असल्याचे सांगण्यात आले.त्याचप्रमाणे ग्रामसभा कमी करणे,१५ऑगस्ट,२६जानेवारी,१मे,२ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या दिवशीच्या ग्रामसभा त्या दिवशी न घेता दुसर्या घेण्यावर चर्चा करण्यात आली.शिक्षक आमदाराच्या धर्तीवर सरपंच- ग्रामसेवकांचे प्रतिनिधीत्वासाठी विधानपरिषदेत आमदार देणे,सरपंचांना अधिक अधिकार देणे इत्यादी विषयांवर एकमताने मागणी करण्यात आली.ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करून सरपंचाना अपमानित करून आर्थिक चिरीमिरी साठी ग्रामसेवकांवर एकतर्फी कार्यवाही करणारे गोंदिया जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे हटाव पंचायत राज बचाव हा ठराव एकमताने पारित करण्यात येऊन कार्यवाही साठी ग्रामसेवक संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.या मेळाव्याला जिल्हाभरातील सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर मेळाव्याचे संचालन ग्रामसेवक गणेश मुनींश्वर यानी केले.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन तर आभार सचिव दयानंद फटींग यांनी मानले.सदर कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर यांचे हस्ते नव्याने स्थापन केलेली ग्रामसेवक सहकारी संस्था कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.