मोहफुलांवरील बंदी उठवण्याची मागणी

0
10

नागपूर- मोहफुलांवरील सरकारी बंदीचा विषय विदर्भात पेटण्याची चिन्हे आहेत. आदिवासींच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या मोहफुलांवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी गावकरी आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. या मागणीला अ‍ॅकॅडमी ऑफ न्युट्रिशन इम्प्रूव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल कोठारी यांनी जोरदार उचलून धरत आंदोलनात उतरण्याची घोषणा केली आहे.
विदर्भाचे अण्णा म्हणून ओळखले जाणारे डॉ. कोठारी यांनी सात दिवसांच्या उपोषणावर बसण्याचा इशारा सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एक पत्र पाठवून डॉ. कोठारी यांनी आदिवासींच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. मोहफुलांवर महाराष्ट्र सोडले तर कुठेही बंदी नाही. ती उठावी यासाठी कोठारी गेल्या २० वर्षापासून आवाज उठवत आले आहेत.