नगरसेवक मसराम मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करा

0
15

अर्जुनी मोरगाव,दि.05ः-स्थानिक नगरपंचायतीचे नगरसेवक माणिक मसराम यांच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अजुर्नी-मोर तालुका भाजपातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, भाजपाचे नगरसेवक माणिक मसराम यांचा मृतदेह २१ मे रोजी ग्रामीण रूग्णालयाच्या आवारभींतीजवळ आढळला. दरम्यान त्यांचा मृत्यू अपघातामुळे की घातपातातून झाला या चचेर्ला परिसरात चांगलेच उधान आले आहे. तर, विरोधी पक्षांनीही या मृत्यूचे राजकारण करून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत आपली पोळी भाजून घेतली होती व आताही भाजपावर आरोप-प्रत्यारोप करून आदिवासी बांधवांना भडकाविण्याचे काम होत आहे. त्यामुळे तालुका भाजपाची बदनामी होत आहे. विरोधी पक्षाच्या या भूमिकेचा भाजपा निषेध करीत असून माणिक मसराम यांच्या मृत्यूची नि:पक्षपणे सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी तालुका भाजपाची मागणी आहे.
सदर मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना पंस सभापती अर0वद शिवणकर, मिना शहारे, होमराज ठाकरे, व्यंकट खोब्रागडे, नुतन सोनवाने, नितीन नाकाडे, टिकाराम नाकाडे, रामू केशरवाणी, गिरधारी नाकाडे, डॉ. गजानन डोंगरवार, बालू बडवाईक, संदिप कापगते, नारायण गायकवाड, सुभाष खुणे, गोविंद वालदे, विनायक ठाकरे उपस्थित होते.