अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी 

0
7

गोंदिया,दि.30 : गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा येथे शेतात काम करीत ४४ वर्षीय शेतकर्‍यावर अस्वलाने मागेहून हल्ला चढवून जखमी केल्याची घटना २८ जून रोजी दुपार दरम्यान घडली. तालुक्यातील बोळुंदा येथील प्रेमलाल हरीचंद मेंढे (४४) हा शेतात धानपेरणीचे काम करीत होता. यातच झुडपीत दबा धरुन असलेल्या अस्वलाने अचानक मागेहून हल्ला चढवून चावा घेतला. प्रेमलाल याने आरडाओरड केल्याने शेजारच्या शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली असता अस्वलाने पळ काढला. घटनेची माहिती वन विभागातील अधिकार्‍यांना देण्यात आली. जखमी प्रेमलालला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचाराकरीता गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी प्रेमलालला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी बोळुंदा वासीयांनी केली आहे.