गोरेगावात रानमेवा जिवनोपयोगी खाद्यपदार्थ स्टोर्सचे उदघाटन

0
12

गोरेगाव,दि.30ः-महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या व्याघ्र संरक्षण परियोजना अंतर्गत वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वतीने जंगल प्रभावित क्षेत्रातील महिला बचत गट, नवयुवक यांना प्रशिक्षण देऊन रान मेव्यापासून स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करून गोरेगावात निसर्ग स्टोर्स उद्घाटीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद््घाटन न.प.अध्यक्ष आशिष बारेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न.प. उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, मुख्याधिकारी हर्षला राणे, वाईल्ड लाईफ ट्रस्टचे प्रोजेक्ट हेड मॅनेजर अनिल नायर, फिल्ड ऑफिसर मनिषा असरफ, नितीन रावते, संजय घासले, हिवराज राऊत, जितेंद्र कटरे व न.प.चे कर्मचारी, गावकरी तसेच जि.प. रुरल विकास अधिकारी वधाणी, नरेश रहांगडाले, अनिल कुंजे प्रामुख्याने उपस्थित ह.ोते. यावेळी व्याघ्रप्रकल्प प्रोजेक्ट हेड मॅनेजर अनिल नायर यांनी व्याघ्र प्रकल्पात येणार्‍या गावातील जनतेच्या मनातील भिती दुर करण्यासाठी, त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी, आय.व्ही.सी.एन. व डब्ल्यू. टी.आय.द्वारे गावात व आजूबाजूला रोजगाराच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून संधी उपलब्ध केल्या जात आहे. जेणेकरून जंगलाचे संरक्षण, पर्यावरण संतुलन, वन्यजीवांचे संरक्षण व्हावेयासाठी शासन व प्रशासन स्तरावर प्रभावित क्षेत्रात मोठय़ा योजनांचा लाभ दिल्या जात आहे.
नवेगावबांध, नागझिरा या व्याघ्र प्रकल्पातील गोरेगाव, सडक-अर्जुनी, देवरी तालुक्यात ११ गावातील ५३ महिला पुरुष व नवयुवकांचे १५ बचत गट जोडण्यात आले आहे. यावर्षी त्यांना ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र वर्धा, मध्य प्रदेश विज्ञान सभा छिंदवाडा येथे प्रशिक्षण देण्यात आले व खाद्यपदार्थ निर्मिती करण्यातआली. यात जंगली फळ, भाज्या, फुले यापासून लोणचे, शरबत, ज्ॉम, जेली, स्क्रबर तयार करून विकण्यात आले. यात अनेक गटांना १0 ते १५ हजार रुपयांची आवक झाली. तसेच जंगल तोड होऊ नये म्हणून उन्नत चुलींचे वाटप करण्यात आले.