जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
7

गोदिया,दि. १७ :- गोंदिया जिल्ह्यात १६ जुलै ते १७ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया नियंत्रण कक्ष यांचे मार्फत करण्यात आले आहे.
सर्व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येतो की, दिनांक १६.०७.२०१८ व १७.०७.२०१८ रोजी गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान शक्यतो बाहेर जाण्यास टाळावे. रस्त्यात किंवा ज्या ठिकाणी पाणी भरलेला असेल तेथून वाहन घेऊन किंवा जाण्यास टाळावे. नदी, नाल्यावरून पाणी जात असल्यास रस्ता ओलांडू नये. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. कुठल्याही परिस्थितीत पुलावरून जाणाऱ्या पाण्यात दुचाकी, चार चाकी वाहन टाकू नये. नागरिकांनी पूर पाहण्यासाठी पुलावर गर्दी करू. तसेच पाण्यात उतरण्याचा प्रयत्नही करू नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया यांचा संपर्क क्रमांक ०७१८२- २३०१९६/ ९४०४९९१५९९ हा असून या क्रमांकावर नागरिकांनी आपत्ती बाबत माहितीसाठी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.