आयटीआय ते कवलेवाडा रेल्वेचौकी रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण

0
11

गोंदिया,दि.26- गेल्या काही वर्षापासून गोंदिया जिल्हा परिषदेच्या गोंदिया उपविभागातंर्गत येणारा आयटीआय ते कवलेवाडा हा रस्ता या विभागासाठी पुरणपोळीचे जेवण देणारा रस्ता ठरला आहे.वर्षातून दोनदा दुरुस्ती होऊनही या रस्त्याची दुरावस्था मात्र दूर होण्याचे नाव घेत नाही अशी अवस्था झाली आहे.त्यातही हा रस्ता विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी यांच्या मतदारसंघातीलच नव्हे तर यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच आहे.
या रस्त्यावर उपविभागीय अभियंत्याने लाखो रुपये खर्चे केले आहेत दुरुस्तीच्या नावावर म्हणा की नविनिकरणाच्या नावावर.तरीही हा या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे कसे पडतात हा प्रश्न संशोधनाचा ठरला आहे. आजच्या घडीला या रस्त्यावरुन चालणे म्हणजे आपले जीव मूठीत घेऊन चालण्यासारखेच आहे.पावसाळ्याच्या पाण्यात तर या रस्त्यावरील खड्डेच दिसत नाही आणि दुचाकीस्वार असो की सायकलस्वार यांचा तोल सूूटून अपघात होण्याची घटना या नियमितच झालेल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा मतदारसंघातील तो ही जिल्हा परिषेदपासून काही हाकेवर असलेला हा रस्ता अशा दुरावस्थेत असतानाही कसा दिसत नाही.लोकप्रतिनिधी व अधिकारी हे रस्ते दुरुस्तीच्या नावावर पैसा कुठे खर्च करतात आता हा प्रश्न या रस्त्याची अवस्था बघून होऊ लागली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी हे भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे त्यांनी किमान या रस्त्यावर गेल्या चार वर्षात किती रुपये कुठल्या निधीतून खर्च झाले याचा शोध घेऊन काम करणाèया कंत्राटदारासह अभियंता व उपविभागीय अभियंत्याची सखोल चौकशी करण्याची गरज झाली आहे.हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असला तरी या पुर्वी या रस्त्यावर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गतही काम झाल्याची चर्चा नागरिकात आहे.
एकाच रस्त्यावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व जिल्हा परिषदेचा उपविभाग काम करीत असल्याने खरा काम कुठला विभाग करतो आणि कुठला विभाग पैसा न खर्च करता उचल करतो याचीच चौकशी व्हायला हवी.तसेही गोंदियाच्या उपविभागात तर काही भ्रष्टाचारी अधिकारी असे ठाण मांडून बसले आहेत की त्यांना काही भीतीच नाही.एका अधिकाèयाने तर तेथील एका परिचराला सुध्दा मारहाण केली होती अशी चर्चा आहे.त्या परिचराच्या डोक्याला मार लागल्याने रक्त सुध्दा निघाले होते.परंतु ते प्रकरण कुठे व कुठल्या अधिकाèयाने का दाबले हे सुध्दा समोर आले नाही.या विभागातर्गंत मोठे घोटाळे असून काही दोन चार कंत्राटदार हे तेथील काही अभियंते व उपअभियंत्यासोबतच भागीदारीमध्ये काम करीत असल्याने काही काम न होताच पैसाची उचल होत असल्याची बोंबाबोब होऊ लागली आहे.
आयटीआाय ते कवलेवाडा रेल्वेचौकीदरम्यानच्या तीने ते चार किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन काही चालकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या जोरदार पावसाने तर हे खड्डे कुठे व रस्ता कुठे शोध दुचाकीस्वारासह पादचाèयांना घेताना त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील लोकप्रतनिधींनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देवून वाहनचालकांच्या जिवाचे संरक्षण करण्याची मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सदर रस्त्याच्या डागडुजी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाहीची मागणी सुद्धा होत आहे.