27.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Top News मुख्यमंत्री बदलले तर, सहा अपक्ष आमदार भाजपचा पाठिंबा काढणार-रवी राणा

मुख्यमंत्री बदलले तर, सहा अपक्ष आमदार भाजपचा पाठिंबा काढणार-रवी राणा

0
21

मुंबई,दि.26(वृत्तसंस्था)- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाने सुरु केलेले आंदोलन तीव्र झाले आहे. त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्री बदलाच्या दाव्यावरून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री बदलले तर सहा अपक्ष आमदार पाठिंबा काढणार असा इशारा अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अामदार रवी राणा यांनी दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत, असेही आमदार राणा यांनी म्हटले आहे.