ईटान-कोलारी पुलाचे स्वप्न होणार साकार

0
8

लाखांदूर,दि.28 : भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगेवरील ईटान-कोल्हारी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १३७ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीला १९ जुलै १८ ला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलाचे स्वप्न साकार होत असल्याने या परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सदर पुलाची गरज लक्षात घेवून ईटान कोलारी सेतु निर्माण कृति समितीचे संपर्क प्रमुख उध्दव कोरे यांनी या पुलाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेवून हे आव्हान स्विाकरले. त्यांनी कृती समितीमार्फत शासन, प्रशासन आणि भाजप संघटनेकडे  पाठपुरावा केला. परिणामी या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली.
सुमारे ४० वर्षापुर्वी किटाडी-विरली (बु) या जिल्हामार्गाचे बांधकाम करण्यात आले. त्याचवेळी भंडारा व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाºया ईटान-कोलारी पुल बांधकामासाठी सर्वेक्षण झाले होते. कालांतराने हा प्रस्ताव मागे पडला. याच संधीचा गैरफायदा घेवून जिल्ह्यातील एका वजनदार लोकप्रतिनिधींनी हा पूल अन्यत्र हलविण्याचा डाव आखला. याविषयी परिसरात कुणकुण लागताच नि:स्वार्थ समाजसेवेचे व्रत घेतलेल्या उध्दव कोरे यांनी याविरुध्द लढण्यासाठी कंबर कसली.
ईटान – कोलारी सेतु निर्माण कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून सदर पुलासाठी पाठपुरावा करुन पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा देण्याची ठरविण्यात आले. या समितीमध्ये अध्यक्ष वामन बेदरे, निमंत्रक अनिल मेंढे, संयोजक राजेंद्र फुलबांधे, संपर्क प्रमुख उध्दव कोरे, तर सदस्य म्हणून कृष्णाजी शहारे, प्रदिप बुराडे, संजय गजपुरे, वामन तलमले, चंदाबाई राऊत, दयावंती शिलार, अशोक प्रधान, डॉ. वासुदेव विधाते, मेघेश्याम वैद्य, शंकर हुमने, विश्वपाल हजारे, अशोक पारधी, गजानन ठाकरे आणि हरिशचंद्र भाजीपाले यांचा समावेश आहे.