जिल्ह्याला अव्वल बनविण्याचे प्रयत्न-आ.अग्रवाल

0
15

गोंदिया,दि.28: शासनाच्या यादीत गोंदिया जिल्हा मागासलेला व नक्षलग्रस्त आहे. या जिल्ह्याला विकासाच्या माध्यमातून राज्यातून अव्वल आणण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला गती दिली. शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालये, आरोग्यासाठी आरोग्य केंद्र-उपकेंद्र व रस्त्यांचे जाळे तयार केले. तालुक्याला हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समाविष्ट करून घेतले. त्यामुळे तालुक्यातील ५६ आरोग्य उपकेंद्रांमध्ये बीएएमएस डॉक्टर्सची नियुक्ती होईल व रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
कटंगटोला येथे ४० लाख रूपयांच्या निधीतून आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीचे लोकार्पण आ. अग्रवाल यांच्या हस्ते, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचा सर्वांगिण विकास आमची भूमिका आहे. रस्त्यांच्या विकासासह आरोग्य विभागावर आमचे विशेष लक्ष आहे. समाजाच्या अंतिम घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे ध्येय घेऊन आम्ही कार्य करीत आहोत. उत्तम आरोग्य सेवा प्रत्येक मानवाचा अधिकार असून ते उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे यांनीही मार्गदर्शन करून गोंदिया विधानसभा क्षेत्रात झालेल्या व होणाऱ्या विकास कार्यांचा उल्लेख केला.
याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. आरोग्य सभापती रमेश अंबुले, महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती विमला पटले, माजी पं.स. उपसभापती मनिष मेश्राम, माजी पं.स. सदस्य सत्यम बहेकार, जिल्हा काँग्रेस सचिव गेंदलाल शरणागत, पं.स. सदस्य सुनिता दोनोडे, टिकाराम भाजीपाले, कृउबासचे संचालक सावलराम महारवाडे, मनोज दहिकर, दिनेश अग्रवाल, महेंद्र गेडाम, सरपंच दुर्गा कावरे, उपसरपंच लक्ष्मीचंद मेश्राम, माजी सरपंच प्यारेलाल कावरे, वडेगावच्या सरपंच योगिता पाचे, जमील भाई, दुरूग बाहे, डॉ. जगदीश पारधी, हेमराज देशकर, लक्ष्मी पाचे व नागरिक उपस्थित होते.