गोरेगाव नगर झगमगले एलईडी बल्बने

0
12

गोरेगाव,दि.28 : नगरपंचायत प्रशासनाने पावसाळ्यात पथदिव्यांची देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेवून १५ दिवसांपूर्वी नगरातील गल्लोगल्लीत लागलेल्या विद्युत खांबांना एलईडी बल्बची जोडणी केली. यामुळे गोरेगाव नगर रात्रीच्या वेळेस एलईडी बल्बने झगमगले आहे. जणू गोरेगाव नगराला एका मोठया शहराचे स्वरुप आले आहे. विशेष म्हणजे, नगरपंचायत प्रशासनाने डासांचा प्रभावावर आळा घालण्यासाठी धूर फवारणी व स्वच्छतेसंदर्भातही काळजीपूर्वक कामे सुरू केली आहेत.
गोरेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी प्रशासनातील सर्व पदाधिकाNयांना विश्वासात घेवून गोरेगाव स्वच्छ व सुंदर बनविण्याचा ध्यास घेतला. यानुरुप सर्वप्रथम गोरेगावात पथदिव्यांमध्ये एलईडी बल्ब लावण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरातील प्रत्येक गल्लोगल्लीत असलेल्या खांबांवर एलईडी बल्ब लावण्यात आले. त्यामुळे आजघडीला गोरेगाव नगर रात्रीच्या वेळेस झगमगल्यासारखे अनुभवास येऊ लागले आहे. त्याचप्रमाणे कचNयाची विल्हेवाट नियमित लावली जात आहे. शिवाय नाली
सफाईचे कामही नियमित केले जात आहे. एवढेच नव्हे तर नगरातील नागरिकांना डासांचा त्रास होऊ नये, यासाठी घरोघरी धूर फवारणीचे कार्यही हाती घेतले आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना गोरेगाव नगरातील नागरिकांना डासांपासून सुटका मिळाली आहे. असे असले तरी स्वच्छतेच्यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाला आणखी काळजीपूर्व काम करण्याची गरज आहे.