ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचे तिनतेरा

0
17

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.28 : नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे, शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी शासन वर्षाकाठी आरोग्य सेवेवर कोटयवधी रुपये खर्च करते. मात्र, अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवाराच उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा पाढा कितीही वाचला तरी कमीच आहे. मंत्री महोदयांना या रुग्णालयातील प्रकाराविषयी अनेक वेळा माहिती देण्यात आली आहे. यात सुधारणा तर दूरच पण
बिघडलेली आरोग्य व्यवस्था सुधारण्यात येथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून मंत्रीुसद्धा कमजोर पडलेत, अशी चर्चा होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांपेक्षा हे रुग्णालय समस्यांच्या विळख्यात सापडले असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणारे महत्त्वपूर्ण व संवेदनशील रुग्णालय म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील लहानमोठ्या घातपातापासून तर अपघातातील रुग्णांसह दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी येणाNया रुग्णांना तत्पर सेवा मिळणे गरजेचे आहे. मात्र, तालुक्यातील दूरच्या ठिकाणाहून येणाNया रुग्णांना आवश्यक ती सेवा पुरविली जात नाही. रुग्णालयात अनेक समस्या दिसून येतात. वेळेवर डॉक्टर उपलब्ध राहात नाही. तर औषधांचा पुरवठासुद्धा आवश्यक त्या प्रमाणात होत नाही. अशा अनेक समस्या रुग्णालयात असल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. रुग्णालयात घाणच घाण स्वच्छतेअभावी अनेक प्रकाराचे आजार, रोग बळावत असतात. त्यामुळे रोगराईची लागण होत असल्याने काळजी घेणे आवश्यक असते. मात्र, या रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून घाणच घाण दिसून येते. यामुळे रुग्णालयात येणाNया रुग्णांना पुन्हा रोगी होण्याची चिन्हे दिसत आहेत. शौचालय, स्वच्छतागृह तुडुंब, भरलेले आहेत. तसेच पिण्याचे पाणी अस्वच्छ आहे. याकडे लक्ष देवून प्रशासन जागे होणार काय? अशी चर्चा आहे.