17 वाहनांवार आरटीओची कारवाई

0
8

गोंदिया ,दि.30ः- विनापरवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या व नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण १७ वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला. तर ५ खासगी वाहनांचा परवाना निलंबित केला.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वाहनांना परवाना घ्यावा लागतो. तसेच नियमानुसार वाहनांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, शहरात आणि जिल्ह्यात खासगी वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. पालकसुद्धा विद्यार्थ्यांना स्कूल बसऐवजी खासगी वाहनातून शाळेत पाठवित होते. विशेष म्हणजे, खासगी वाहनचालक ऑटो, पिकअप, मारोती व्हॅनमधून शालेय विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करीत होते. या वाहनांमध्ये उच्च न्यायालय व उपप्रादेशिक परिवहन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, खासगी वाहनचालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी रितसर परवाना घेतला नव्हता. रम्यान, उपप्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यात मोहीम राबवून विनापरवाना विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या ५ वाहनांवर कारवाई करून या वाहनांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला. नियमांचे उल्लंघन करणार्?या १२ स्कूल बसेसवर दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईमुक्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या खासगी वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे