केंद्र व राज्य सरकार विरोधात संघर्ष करा – रहांगडाले

0
11

गोरेगाव,दि.03ः-केंद्र व राज्य सरकार जनविरोधी निर्णय घेत असून दलित, आदिवासी, अल्पसंख्यक समाजावर अन्याय वाढत आहे.शंभर दिवसात महागाई कमी करण्याचा आश्‍वासन खोटा ठरला आहे, पेट्रोल, डीझेल, केरोसिन चे भाव वाढत आहेत, दोन कोटी बेरोजगारांना दर वर्षी रोजगार मिळाले नाही, असंघटित कामगार यांना अठरा हजार रुपये वेतन मिळाले नाही या करीता केंद्र व राज्य सरकार विरोधात संघर्ष करण्याचे आवाहन हौसलाल रहांगडाले यांनी केले. ते चेतराम दियेवार यांच्या अध्यक्षतेखाली १ ऑगस्ट रोजी आयोजित तालुका विस्तारित सभेत बोलत होते. या वेळी अन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माल्यार्पण करण्यात आले. पुढे बोलतांना रहांगडाले यांनी १ ते १४ ऑगस्ट दरम्यान गोरेगाव तालुक्यात आठ सभा जिल्ह्यात २५ जाहीर सभा घेण्यात येतील. तसेच ८ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या मोच्र्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी चरणदास भावे यांनी सहायता फं ड जमा करणे, शेत मजुरांच्या देशव्यापी आंदोलना अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोच्र्यात सहभागी होण्याचे व २0 ऑगस्टला चंद्रपूर येथे किसान मोच्र्यात १00 कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगितले. यावेळी कल्पना डोंगरे यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परेश दुरूगवार यांनी केले