धापेवाडा प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकरी एकवटले

0
10

तिरोडा,दि.03ः- तालुक्यातील कवलेवाडा येथील नदीपात्रात तयार करण्यात आलेल्या धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी खरीप हंगामातील धान पिकाला देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन  कवलेवाडा येथील शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकारी धापेवाडा उपसा सिंचन योजना यांना दिले आहे.
तिरोडा तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातही तसेच भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातही या प्रकल्पामुळे जमीन सिंचीत होईल, अशी आशा शेतकर्‍यांमध्ये निर्माण करण्यात आली. परंतु, सिंचन प्रकल्पाला लागून असलेल्या कवलेवाडा येथील शेतकर्‍यांनाही या सिंचन प्रकल्पाचा पाहिजे तेवढा लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यातच यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून रोवणीचे कार्य अंतिम टप्प्यात आहेत.
निवेदन देतेवेळी जि.प.सदस्य मनोज डोंगरे, कवलेवाडाचे सरपंच किरण पारधी, उपसरपंच तानेश्‍वर रहांगडाले, जितेशकुमार बोदेले, रतिराम पारधी, घनश्याम ठाकरे, श्यामराव बोदेले, दिलीप भैरम, कुंजीलाल पारधी, रेखलाल पारधी, अमृतलाल पारधी, घनश्याम भैरम आदी शेतकरी उपस्थित होते.