महिला विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागल्या-आ.रहागंडाले

0
12

तिरोडा,दि.10ः- आजच्या घडीत आर्थिक समस्या आल्यास बचत गटांच्या माध्यमातून महिला आपली आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सज्ज झाल्या असून महिला आता सक्षम होत असून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
ते महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट रोजी श्रीश्याम मंगलम सभागृहात आयोजित महिला बचत गट मुद्रा योजना मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून निताताई राहंगडाले उपस्थित होत्या. यावेळी प्रामुख्याने विजय देशमुख मुख्याधिकारी नगर परिषद, तिरोडा, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, मनोहर राऊत, जि.प. सदस्य रजनी कुंभरे, कैलाश पटले, प्रिती रामटेके पं.स. सदस्य माया भगत, तहसीलदार संजय रामटेके,समाजसेविका प्रा.सविता बेदरकर,रजनी रामटेके आदि मान्यवर उपस्थिती होते.
आ. रहांगडाले पुढे म्हणाले कि, माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचतगटाच्या स्थापनेतून महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आता सक्षम होत आहेत. या सोबतच बचतगटातील महिलांनी प्रधानमंत्री जनधन योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्याकरीता बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याचे सांगून प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत युनियन बँक व बँक ऑफ महाराष्ट्र अश्या विविध बँकाकडून बचतगटांच्या २0 माहिलांना १0 लाख रुपयाचे कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून प्रेरणा ग्रामसंस्था भिवापूर व उत्कृष्ट गट अर्पण महिला बचत गट बेलाटी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने तालुक्यातील महिला बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन सारीका बन्सोड यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कार्यक्रम व्यवस्थापक शिल्पा येडे, गजेंद्र ठाकरे,नामदेव बांगरे, अनिता आदमने आदिनी सहकार्य केले