आदिवासी दिनानिमित्त महारॅलीने शक्तीप्रदर्शन

0
12

गोंदिया ,दि.10ः-जागतिक मुलनिवासी दिन (आदिवासी दिन) निमित्त  (दि.९) आदिवासी समाज संघटनेच्या वतीने शहरात महारॅली काढून आदिवासी बांधवांनी शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, आदिवासी समाजात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नये, अशा आशयाच्या घोषणाबाजी करीत समाजबांधवांनी शासन व्यवस्थेला जागृत करण्याचा प्रयत्नही केला. आदिवासीबांधवांच्या महारॅलीने गोंदिया शहर भ्रमण केले. यावेळी ‘एकता भारी, आदिवासी लयभारी’ अशा घोषणा देत आदिवासी समाज संघटनांनी शहरात एकतेचा परिचय दिला.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी हलबा-हलबी समाज संघटना कटंगी, आदिवासी प्रवगार्तील सर्व समाज संघटना, नॅशनल आदिवासी पिपल्स महिला विद्यार्थी फेडरेशन गोंदिया जिल्हा, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी विद्यार्थी संघ, गोंडवाना मित्र मंडळ आदी संघटनांच्या वतीने गोंदिया शहरात डॉ. नामदेवराव किरसान, जि.प. अध्यक्ष सीमाताई मडावी, श्रावम राणा, दुर्गाप्रसाद कोकोडे, विनोद पंधरे, जे.टी. दिहारे, कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम,विजय मडावी,अजय कोठेवार,भरत घासले आदी समाजप्रमुखांच्या नेतृत्त्वात स्टेडियम येथून महारॅली काढण्यात आली.
सर्वप्रथम रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी बंधू-भगिनींना डॉ.नामदेवराव किरसान यांनी मार्गदर्शन केले. यानंतर रॅलीने नेहरू चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक, मनोहर चौक, छोटा गोंदिया, मामा चौक, इंगळे चौक या मागार्ने भ्रमण करीत उपविभागीय कार्यालयासमोर रॅलीचे सर्मथन करण्यात आले. दरम्यान, महारॅलीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी ‘एक आदिवासी लयभारी’ अशा घोषणा देत एकतेचा परिचय दिला. आदिवासी बांधवांच्या शक्ती प्रदर्शनाने गोंदिया शहर दुमदुमले होते. रॅलीमध्ये प्रामुख्याने जि.प. सदस्य रोहिणी वरखडे, मंदाताई कुंभरे, शीलाताई उईके, रजनी कुंभरे, सुनिता कोकोडे, अल्काताई कोठेवार, प्रमिला करचाल, वनिता पंधरे, आरती चवारे, प्रमिला सिंद्रामे, भोजराज चुलपार, चंदू मरस्कोल्हे, जीयालाल पंधरे, विजय टेकाम, तुकाराम मारगाये, सुरेखा नाईक, प्रभाकर कोयलारे, हिरालाल राऊत, बालाराम वडगावकर, शंकर कोठेवार, चाकाटे, मोहन पंधरे, दुर्गाप्रसाद नागभिरे, खुशाल खुटमोडे, जे.डी. गावडकर, गुरुनाथ दिहारे, करण टेकाम, कारू परदे, कृष्णा उईके, गोपाल उईके, सुभाष चुलपार यासह हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष सहभागी झाले होते.