आदिवासी विकासासाठी विद्यार्थी धावले

0
6

गडचिरोली,दि.10 : जागतिक आदिवासीदिनानिमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गुरुवार ९ ऑगस्ट रोजी आदिवासी विकास दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत ५६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्थानिक इंदिरा गांधी चौकात सकाळी ८ वाजता विकास दौडला केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक टी. शेखर यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मोहितकुमार गर्ग उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे, पोलीस मदत केंद्रस्तरावर गेल्या पंधरा दिवसांपासून घेण्यात आलेल्या स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता. पोलीस मुख्यालयाच्या मैदानात विकास दौडची सांगता करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस उपमहानिरीक्षक अंकूश शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. .