अॅबेकस स्पर्धेचे आयोजन ३० ला भंडारा येथे

0
12
भंडारा,दि.२६: गोंदिया येथील आबेकस प्रा. ली.यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा येथील लक्ष्मी सभागृह येथे बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेच्या माध्यमाने विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि गणिताचे धडे गिरवले जाणार आहेत. ही स्पर्धा विभागीय स्तरावर असून ह्यात गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर तसेच छत्तीसगड येथील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतील. ३० सप्टेंबर रोजी रविवारी ११.३० वाजता लक्ष्मी सभागृह भंडारा येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अश्या प्रकारचा कार्यक्रम भंडारा शहरात पहिल्यांदा होत असल्याने विद्यार्थ्यांना आतुरता लागली आहे.  आयोजकांनी विद्यार्थी, पालक व नागरिकांना मोठ्या संख्येत उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आव्हान केले आहे.