24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ वाळू तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

वाळू तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

0
47
फाईल फोटो

नागपूर,दि.29 : पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी वाळू तस्करांवर धडक कारवाई करून लाखोंची रेती जप्त केली. शुक्रवारी सकाळपासून दिघोरी ते उमरेड मार्गावर पोलिसांनी चालविलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून रेती चोरून आणायची. ती रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला खाली करायची. त्यानंतर जशी मागणी आहे, त्याप्रमाणे दामदुप्पट भाव लावून ती विकायची, असा वाळू माफियांचा फंडा आहे. पोलीस, महसूल खाते आणि आरटीओतील काही जणांना हाताशी धरून शासनाला कोट्यवधींचा फटका देण्याची वाळू तस्करांची ही नेहमीची पद्धत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ओव्हरलोडचे काम सांभाळणाऱ्या आदिल नामक दलालाकडून तस्करांना कारवाई न करण्याची हमी मिळाल्याने वाळू तस्करांनी रेतीची चोरी-तस्करी जोरात सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी घाटावरून चोरून आणलेली लाखोंची रेती दिघोरी-उमरेड मार्गावर दुतर्फा साठवून ठेवलेली आहे. ही माहिती कळताच परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, शुक्रवारी पहाटे ५ वाजतापासून कारवाईचा धडाका लावण्यात आला. नंदनवन तसेच परिसरातील आऊटर रिंगरोडने जाणारे रेतीने भरलेले १० ते १५ ट्रक पोलिसांनी पकडले. त्यात लाखो रुपये किमतीची रेती आहे. केवळ टड्ढकमध्येच नव्हे तर रस्त्याच्या दुतर्फा, शेतात बेवारस अवस्थेत साठवून ठेवलेली रेती कुणाची आहे, त्याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.