24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ सिलेगाव ग्रामवासियांचे आरोग्य धोक्यात

सिलेगाव ग्रामवासियांचे आरोग्य धोक्यात

0
48
गोरेगाव दि.29 (पराग कटरे)ः- तालुक्यातील सिलेगाव येथे गावातील सांडपाणी वाहून नेणार्या नाल्यांची स्वच्छता न झाल्याने सांडपाणी साचले जात असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे.सोबतच गावातील नागरीकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.ग्रामपंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी स्वच्छतेसाठी मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.एकीकडे महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत मिशन या उपक्रमातून गावामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करीत आहेे.त्यासाठी ग्रामपंचायतीला निधी सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र सिलेगावात ग्रामपंचायतीकडून मात्र अस्वच्छतेचे धोरण राबविले जात असल्याने जिल्हास्तरावरील स्वच्छता अभियान कार्यालयाचेही देखरेख व्यवस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.