शॉट सर्किटमुळे घर जळून खाक ; पिंडकेपार येथील घटना

0
11

गोरेगाव,दि.२३ः- तालुक्यातील पिंडकेपार येथील रामु उरकूडा मौजे यांच्या घराला विद्युत शॉट सर्किटमुळे आग लागून ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की रामू मौजे हे काही कामानिमीत्त साकोली येथे गेले असता त्यांचे कुटूंबही शेतात धान कापण्यासाठी गले होते. याच दरम्यान विद्युत शॉट सर्किटमुळे घराला आग लागली. घटना निदर्शनात येताच शेजाèयांनी आरडा-ओरडा करून घटनास्थळाकडे धाव घेतली व पाण्याने आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत घरातील कपडे, पंखा, सायकल व इतर साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती तलाठी डहाट यांना देण्यात आली. माहिती मिळताच घटनेचा पंचनामा करून तसा अहवाल त्यांनी वरिष्ठांकडे सादर केला असून या घटनेत रामू मौजे यांचे सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.तेव्हा मौजे कुटूंबीयांना शासनाकडून त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकèयानी केली आहे.