रेशीम शेतकऱ्यांना सर्वोतपरी मदत करू-आ.डॉ परीणय फुके

0
12

पवनी(राजेंद्र फुलबांधे),दि.23ः-धान पट्ट्यातील युवकांनी रेशीम शेतीचा नवा प्रयोग करुन धानशेतीला पर्याय दिला असून रेशीम शेतीच्या प्रचारप्रसारासोबतच वाढीसाठी आपण पुर्णत सहकार्य करणार असल्याची ग्वाही विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांनी दिली.ते पवनी तालुक्यातील आसगाव येथे रेशीम उत्पादन शेतकर्यांच्या बैठकित बोलत होते.जिल्ह्यात १५० च्या जवळपास रेशीम शेतकरी असून तांत्रीक कारणामुळे पाहिजे ती गती मिळालेली नाही,यासाठी आपण चाकी रेअरींग सेंटर मंजूर केले आहे. याशिवाय व्यवसाय वाढीसाठी आधुनिक यंत्रसामग्री व इतर बाबींसाठी पाच कोटींपर्यंत प्रस्ताव आल्यास आपण मंजूर करू देऊ असे आश्वासन MEET THE FARMERS या कार्यक्रमात आ. फुके यांनी दिले.रेशीम शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, तांत्रिक कमतरता, मार्केटिंगचा प्रस्न,अधिकार्यांची अडचण आदी समस्या शेतकरी संवादातून समोर आल्या.याशिवाय आधारभूत धान खरेदी ,तुततुडा यादीतील घोळ, रस्त्यापासुन दुर असलेले ट्रान्सफार्मर,असे अनेक प्रश्न चर्चेस आले. यावेळी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, प्रा. हेमंत देशमुख, सुरेंद्र आयतुलवार, हरीश तलमले,तिलक वैद्य, आसगावचे सरपंच बिपिन बोरकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र फुलबांधे, गुलाब वैद्य, राजपूत गजभिये, जिवन पुंडे, लोकेश गभने, प्रकाश कुर्झेकर यांनी प्रयत्न केले. तब्बल तीन तास उशिरा सुरू होऊनही कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.