साकोलीत राकाँचे बेमुदत उपोषण

0
15

साकोली,दि.03ः- साकोली व लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.यावेळी उपविभागीय कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी विधानसभा प्रमुख अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, सुरेश कापगते, प्रदिप मासुरकर, डॉ. अनिल शेंडे, शैलेश गजभिये, अशोक लिचडे, शंकर खराबे, अंगराज समरीत व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. परंतु, जिल्ह्यातील साकोली व लाखांदूर तालुक्यात अल्प पाऊस व मावा, तुडतुड्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असताना शेतकर्‍यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांच्या न्याय मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकर्‍यांसोबत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.