गीतादीदीद्वारे श्रीमद्भागवत प्रवचन व शोभायात्रा

0
12

गोंदिया : स्थानिक जे.एम.पटेल हायस्कूलच्या मैदानावर प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वस विद्यालया गोंदियाच्या वतीने योगशक्ती गीतादीदीव्दारे श्रीमद् भागवत प्रवचनाचे आयोजन २३ नोव्हेंंबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून शोभायात्रेत गीता दीदी तथा रत्नामाला दीदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.शोभायात्रेचा शुभारंभ नगराध्यक्ष अशोक इंगळे हे करणार असून यावेली न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा,घनश्याम पानतावने,मैथुला बिसेन,दीपक बोबडे,जितेंद्र पंचबुद्धे उपस्थित राहणार आहेत. सदर शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने भ्रमण करून प्रवचनस्थळी येणार आहे. २.३० वाजता श्रीमद् भागवत प्रवचनाला खासदार प्रफुल्ल पटेल,खासदार मधुकर कुकडे,आमदार गोपालदास अग्रवाल,माजी खासदार नाना पटोले,राजेंद्र जैन, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी,दिलीप बन्सोड,अशोक गुप्ता हे उपस्थित राहणार आहेत. तेव्हा आयोजित प्रवचनाचा शहरवासीयांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे..