प्रदूषण मंडळाच्या अहवालाआधीच पवनपुत्र मिनरल कारखान्याला तिरोडा एसडीओची क्लिन चिट

0
17

गोंदिया,दि.02ः- गोरेगाव तालुक्यातील कालीमाटी येथील श्री पवनपुत्र मिनरल कारखाना बंद करण्याची तक्रार ग्रामपंचायतीसह नरेंद्रकुमार चौव्हाण व इतर ९९ गावकèयांनी १२ नोव्हेंबरला केली होती. त्याची चौकशी नायब तहसीलदार मनोज वाढे यांनी केली असता या कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण, वायू प्रदूषण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.तक्रारीच्या अनुषगांने या कारखान्याची फेरतपासणी करण्यासंबधीचे पत्र तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी जिल्हा औद्योगिक प्रदुर्षण नियंत्रण मंडळाच्या मुख्य प्रबंधकांना दिले असून त्या पत्रानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीन अद्यापही तपासणी झालेली नाही.
जोपर्यंत प्रदूषण नियंत्रण मडळ तपासणी करीत नाही,तोपर्यंत त्या कारखान्याला क्लिन चिट देता येत नाही.परंतु त्या अहवालाची वाट न बघता तिरोडा उपविभागीय अधिकारी यांनी स्वतःच नायब तहसिलदार व तक्रारदाराला बोलावून दिलेल्या एकतङ्र्कनिर्णयात कारखान्यातून कुठलेच प्रदूषण होत नसल्याचा निर्णय दिल्याने एसडीओ गंगाधर तळपदे यांच्याविरोधात कालीमाटीवासियामध्ये अंसतोंष निर्माण झालेला आहे.
कारखान्याच्या कच्चा माल प्रकिये मुळे गावात ज्याठिकाणी हा कारखाना आहे,त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्कयात आले आहे.श्वसन व दम्याचे आजार वाढले आहेत. यंत्राच्या कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषण होत असून रात्री झोप लागत नाही. गावालगत हा कारखाना असल्याने मुर्तीकार कुटुंबांना मुर्तीॅ रंगवतांना धुळीच्या कणामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
या कारखान्यात कच्चा माल हा मध्यप्रदेशातील भरवेली व उकवा येथून ट्रकद्वारे आणल्या जाते व तयार झालेला माल मागणीनुसार पाठविल्या जाते. याकरिता रस्त्याच्या वापर सतत होत असल्याने रस्त्यावर सुध्दा जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरुन पायदळ जाणे कठीण झाले आहे. तलावातील पाणी, विहिरीचे पाणी दुषित झाल्याने पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. विज सयंत्र उघड्यावर बसविण्यात आल्याने धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. कवेलू, छत, ताळपत्रीवर व झाडांच्या पानावर कारखान्याच्या धुळीचे थर बसले आहेत असे अहवालात नायब तहसीलदार मनोज वाढे यांनी नमुद केले आहे.
श्री पवनपुत्र मिनरल्स कारखान्याला ग्रामसभेने मजुरी दिल्याने कारखाना सुरु असल्याचे संचालकाचे म्हणने आहे.मात्र ते ज्या ग्रामसभेच्या ठरावाचा उल्लेख करीत आहेत,त्या ठरावाचा रेकार्डच ग्रामपंचायमध्ये नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे.
तर या कारखान्यामुळे ज्या नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे त्यांची व तक्रारकत्र्यांची बाजू न समजून घेता एसडीओंनी राजकारणामुळे या कारखान्याला विरोध केले जात असल्याचा उल्लेख करीत कारखान्यामुळे कुठलेही प्रदूषण होत नसून पाणी सुध्दा पिण्या योग्य असल्याचा दिलेला निर्णय प्रशासकीय यंत्रणेतील कामकाजावर शंका निर्माण करणारा ठरल्याचा आरोप तक्रारकर्ते करीत आहेत.
जेव्हा की तहसिलदार डहाट यांनी जिल्हा औद्योगिक केंद्राकडून असलेल्या परवानगीची फेरतपासणी तसेच प्रदूषणाची तपासणी करण्याचे पत्राचे उत्तर अद्यापही तहसिलप्रशासनाला पोचलेले नसतांना एसडीओंनी कुठल्या आधारे कारखान्यामुळे प्रदुर्षण होत नसल्याचा अहवाल दिला हेच कळायला मार्ग राहिलेला नाही.त्यामुळे तक्रारकत्र्यांनी आता विभागीय आयुक्तासंह हरितलवादाकडेच न्याय मागण्याची तयारी सुरु केली आहे.