नगर जेतवन बुद्ध विहारात भीमा कोरेगाव क्रांती विजयदिवस चर्चासत्र

0
28

गोंदिया,दि.02: शूरवीर पूर्वज सैनिकांचा तसेच संत गुरु महामानवांचा वारसा उत्तरोत्तर कायम राहावे यासाठी प्रयत्न म्हणून “कही हम भूल न जाए” या अभियान अंतर्गत स्थानिक श्रीनगर मैत्रीय बुद्ध विहार येथे भीमा कोरेगाव क्रांती विजय दिवसानिमित्त वैचारिक चर्चासत्र व मंथन कार्यक्रम संविधान बचाव कृति संघ, जेतवन बुद्ध विहार समिति, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, व मैत्रीय बुद्धविहार महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांकडून भीमा कोरेगाव लढाईतील शुरवीराना आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आम्बेडकर याना दिप प्रज्वलन करुन मानवंदना देण्यात आली. तसेच कमांडर राजहंस चौरे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. तदनंतर आग्रा येथे जिवंत जाळण्यात आलेल्या मागासवर्गीय संजली यादव आणि वार्डातील सामाजिक कार्यकर्ता दिवंगत विनोद मोटधरे सर याना काही मिनिटाचा मौन पाळुन श्रद्धांजली देण्यात आली.कार्यक्रमाला सामाजिक संघटनेतील पदाधिकारी जिजाऊ ब्रिगेड चे प्रा.सविता बेदरकर, विदर्भ आंदोलन व सविधान बचाव कृति संघाचे संरक्षक गुरमीत चावला, महेंद्र कठाने , अवंतीबाई लोधी महासभेचे शिव नागपुरे, पाली भाषा प्रचारिका ललिता बोम्बार्डे, उमाताई गजभिये, मैत्रीय बुद्ध विहार महिला मंडळ अध्यक्षा विमलताई मेश्राम, संविधान बचाव कृति संघाचे संयोजक अतुल सतदेवे, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव बंसोड़, नूरलाल ऊके, कालिदास सूर्यवंशी , कमलेश शेंडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभेच्या शहर संघटिका लक्ष्मी राऊत यांच्या संचालनात विहार महिला मंडळ तर्फे , पंचशीला पान्तावने, दमयंता मेश्राम, मनोरमा रोकड़े, सायली वाघमारे, रायवंता भीमटे, केशर जाम्भुळकर, शकुंतला हुमने, कमलाबाई चवरे, शिवमाला मडामें, संध्या बंसोड़, कविता ऊके, अनीता मेश्राम, बेबिताई गड़पायले, सुनंदा रामटेके, मंदा बंसोड़, इंदिरा शेंडे, तारा घोड़ेश्वार, चित्रलेखा मेश्राम, मंगला नंदेश्वर, कोटांगले ताई, विमलताई तागड़े, आणि अक्षय कड़बे, प्रियंका सतदेवे, पुष्पक सतदेवे आदि चर्चासत्रा मध्ये प्रामुख्याने सहभागी झाले होते,कार्यक्रम यशस्वीते करिता रोहित सतदेवे, चाहत मेश्राम, बालू चंद्रिकापुरे यानी अथक प्रयत्न केले.