आदिवासी विकास योजनांचे शिबिर लवकरच-आ.अग्रवाल

0
9

गोंदिया,दि.16 : आदिवासी वस्त्यांच्या विकासासाठी कित्येक योजना असूनही त्यांच्या माहिती अभावी आदिवासी नागरीक योजनांच्या लाभापासून वंचीत राहतात. त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी लवकरच आदिवासी विकास योजनांचे शिबिर घेणार असल्याची माहिती आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिली.
ग्राम रतनारा-हरसिंगटोला येथील रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी सोमवारी (दि.१४) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, आदिवासी समाजाचे दैवत बिरसा मुंडा यांनी आदवासींच्या उत्थानासाठी आपले जीवन वाहून दिले. त्यांच्याच आदर्शांना मानत आम्ही आपल्या लोकांसाठी सरकारपुढे नेहमीच संघर्षाची भूमिका ठेवली. यातूनच प्रयत्न करून देवरीच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाची शाखा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उघडली. जेणे करून शासकीय योजनांचा लाभ व त्यांची माहिती येथील आदिवासींना मिळणार असे सांगीतले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, विमल नागपुरे, विनिता टेंभरे, निता पटले, चैनलाल लिल्हारे, रेखा चिखलोंडे, रामप्रसाद कनसरे, सतीश दमाहे, राजाराम बोरकर, धनपाल धुवारे, दुर्गा दमाहे, किरण डोहरे, ओमेश्वरी ढेकवार, सुप्रिया गणवीर, सीमा मोहारे, कौशल्या डोंगरे, दुर्योधन भोयर, संगीता मेश्राम, सुनिता बोरकर, राजु लिल्हारे, जितेंद्र लिल्हारे, उत्तम ढेकवार, देवा गणवीर, प्रमिला बोरकर, प्रेमलाल बिजेवार, रेखचंद सोनवाने, श्यामा बिजेवार, गोपाल बारेवार, देवलाल लिल्हारे, ज्ञानेश्वर टेकाम यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.