उपकोषागार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

0
10

भंडारा,दि.16ः-तुमसर येथील उपकोषागार अधिकारी अशोक केशवराव लेंडे (५३) व लिपिक संजय नरेंद्र श्रीपाद (३६) यांच्याविरुद्ध एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तुमसर येथे ही कारवाई केली.
यातील तक्र ारदार हे उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असून रजिस्टर औषधी पुरवठादारांचे बिले तसेच बाहेरुन विकत घेतलेल्या औषधांचे बिले प्रमाणित करुन सदर बिलाचे देयके कोषागार कार्यालयात देण्याचे काम करतात. उपकोषागार कार्यालय तुमसर येथे आठ रजिस्टर औषधी पुरवठा धारकांचे औषधाचे १0 जानेवारी रोजी ५६ हजार ५११ रुपयांचे देयक सादर केले होते. सदर बिले मंजूर करण्यासाठी उपकोषागार अधिकारी अशोक लेंडे व संजय श्रीपाद यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्र ारदाराने याची तक्र ार भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
मंगळवारी सापळा कारवाईदरम्यान तक्र ारदाराकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना अशोक लेंडे याला अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध तुमसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.