महिलानी अन्यायाच्या विरोधात एकत्र यावे – सरीताताई अंबुले

0
9

गोंदिया,दि.25ः- तालुक्यातील  रामपुरी (एकोडी) येथे आयोजित महिला मेळावा व शिक्षण परिषदेत गोंदिया पंचायत समितीच्या माजी सभापती सरीता अंबुले यांनी महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन अन्यायाच्या विरोधात एकत्र यावे असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले होते.तर उद्घाटन गोंदिया पंचायत समितीच्या सभापती माधुरीताई हरीनखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष अतिथी म्हणून माजी सभापती सरीताताई अंबुले उपस्थित होत्या.
पुढे बोलतांना श्रीमती अंबुले म्हणाल्या की, सध्या आपल्या महिला सर्व क्षेत्रांमध्ये समोर जात आहेत.काही ठिकाणी आपल्या महिला मागे असल्याचे पण दिसून येते.पारिवारिक बंधनाचे उदाहरण देत एखाद्या महिलेंवर अन्याय होत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा अत्याचार होत असेल तर आपल्या महिलांनी त्या वेळी पुढे येण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य व क्रीडा सभापती रमेश अंबुले यांनी महिलांसाठी बचतगट तयार करण्यात आले आहेत, त्या गटांच्या माध्यमातून  महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह खुप चांगल्या प्रकारे करत असल्याचे छान चित्र आपल्याला दिसून येत असल्याचा उल्लेख केला.कार्यक्रमाला गोंदिया पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जावेद इनामदार,सरपंच रवी पटले, आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.