पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा कार्यक्रम

0
59

वाशिम, दि. २५ : पालकमंत्री संजय राठोड हे २५ व २६ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.पालकमंत्री श्री. राठोड हे २५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता यवतमाळ येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण करतील. रात्री ८.३० वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१० वाजता शासकीय वाहनाने वाशिम येथील पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण. सकाळी ९.१५ वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता शासकीय वाहनाने मंगरूळपीर तालुक्यातील दाभडीकडे प्रयाण करतील व तेथे सांत्वनपर भेट देवून मानोरा तालुक्यातील भोयणी कडे प्रयाण करतील. भोयणी येथील भाऊसाहेब नाईक यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतील. दुपारी २ वाजता भोयणी येथून कारंजा तालुक्यातील लोहगावकडे प्रयाण करतील. दुपारी ३ वाजता लोहगाव सुरेश राठोड यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील व दुपारी ३.१५ वाजता शासकीय वाहनाने नेरकडे प्रयाण करतील.