बहुजनांनो जगासमोर टिकण्याची क्षमता स्वत:त निर्माण करा-खेडेकर

0
16

अर्जुनी मोरगाव,दि.02ः- जागतीकरणाच्या युगात पृथ्वीवरील शिक्षण जवळपास संपल्यात जमा झाले आहे. आता आजचे जग तरूण पिढीचे आहे. जग कुठे चाढलयं हे समजून घेवून तरूण पिढीने शिक्षण घेण्यासाठी स्वत:ला तयार करावे. मंगळ, शनि वर यान पाठविणे सुरू आहे. चंद्रावर मानवांनी कधीच पाऊल ठेवली आहेत. पृथ्वीच्या कक्षेबाहेरच अंतराळातील शिक्षण घेण्यासाठी तयारी करावी. यासाठी बहुजनांनो जगासमोर धावण्याची धमक निर्माण करावे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापकीय अध्यक्ष अँड. पुरूषोत्तम खेडकर यांनी नवेगावबांध येथील जनसंवाद कार्यक्रमात केले.
नवेगावबांध येथील शिवाजी चौकात २९ जानेवारीला मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठी बाणा भिम मंडळ द्वारे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरूषोत्तम खेडेकर, देवानंद कापसे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल तरोणे, जिजाऊ ब्रगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रा. सविता बेदरकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष क्रांती ब्राम्हणकर, गुरमीत चावला, प्रा. प्रकाश धोटे, तुषार कापगते, राजेंद्र वाढई, कृष्णकांत खोटेले, सावरटोलाचे उपसरपंच भागवत मुंगमोळे उपस्थित होते.
पुरूषोत्तम खेडेकर पुढे म्हणाले की, विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रचंड स्फोट झाला असून कालची टेक्नालॉजी आज कालबाह्य ठरत आहे. जगात प्रबळ आर्थिक व संधी असलेले राष्ट्र म्हणून चिन व जपान असल्याने आपण सुद्धा चिनी व जपाणी भाषेवर इंग्रजीसोबत प्रभुत्व निर्माण केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनिल तरोणे यांनी केले. त्यांनी फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे कार्य घराघरात पोहचविण्यासाठी बहुजनांनी त्यात समाविष्ट होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन उद्धव मेहेंदळे यांनी केले तर आभार निर्दोश मुनेश्‍वर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन नाकाडे, अंश कापगते, लोकेश जिवतोडे, जनार्धन मेर्शाम, तुकाराम मडावी, धनराज रहेले, प्रकाश शिवणकर, शेखर गावळकर, रामदास कापगते, शेखर दडमल, जितेंद्र नलगोलवार, शरद कापगते आदींनी सहकार्य केले.