रिता उराडेंनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला

0
6

ब्रम्हपुरी,दि.02ः- नगरपरिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष रिता उराडे यांनी दि .१ फेब्रुवारीला पदभार सांभाळला तर स्वीकृत नगसेवकपदी हितेंद्र उर्फ बालू राऊत आणि राकेश कर्‍हाडे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी नगराध्यक्ष रिता उराडे, गटनेते विलास विखार, मुख्याधिकारी मंगेश खवले, नगरपरिषदेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. यावेळी रिता उराडे यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळून उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. निवडणुकीत काँग्रेस-रिपाईने ११, विदर्भ माझा पार्टीने सहा तर भाजपाने तीन जागांवर विजय संपादन केला होता. काँग्रेस-रिपाइंने नगराध्यक्षसहीत ११ जागा जिंकून बहुमत प्राप्त केल्याने रिपाइंचे अशोक रामटेक यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. तर काँग्रेस पक्षाचे बाळू राऊत यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडण्यात आले आहे. विदर्भ माझा पार्टीने राकेश कऱ्हाडे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली आहे. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी कामकाज पाहिले.