24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ लाखनी येथे रविवारला एकदिवसीय ओबीसी अभ्यासवर्गाचे आयोजन

लाखनी येथे रविवारला एकदिवसीय ओबीसी अभ्यासवर्गाचे आयोजन

0
33

लाखनी,दि.09ः- भंडारा जिल्हा ओबीसी संग्राम परिषदेच्यावतीने लाखनी येथील संत तुकाराम सभागृहात ओबीसी समाजाच्या विषयावर एक दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन 10 फेबुवारी रविवारला सकाळी करण्यात आले आहे. या अभ्यासवर्ग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नाना पटोले राहणार आहेत.तर उदघाटक म्हणून भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे उपस्थित राहणार आहेत.प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकजागर पक्षाचे प्रमुख,साहित्यिक कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर,ओबीसी मुक्ती मोर्च्याचे नितीन चौधरी,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,देवानंद पवार,विजयाताई नंदुरकर,सुभाष आजबले,अड रविभुषण भुसारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तालुक्यातील ओबीसी बांधवानी मोठया संख्येने या अभ्यासवर्गाला उपस्थित राहावे असे आवाहन डॉ चंद्रकांत निंबार्ते ,प्रा उमेश सिंगनजुडे,नंदुभाऊ चौधरी ,प्रा अशोक गायधनी,संजयराव वणवे ,डाॅ. श्रीकांत भुसारी ,गोपाळ नाकाडे यांनी केले आहे.