घराला आग लागल्याने 1 लाखाचे नुकसान

0
16
साकरीटोला,दि.10- येथून जवळच असलेल्या मौजा कवडी येथील शेतकरी शामप्रसाद रतिराम ठाकरे वय 42 याचे राहते घर जळाल्याने त्यांना 1लाख रूपयाचे नुकसान झाल्याचे अंदाज वर्तविले जात आहे, सांगण्यात आले की 9 फेब्रुवiरीच्या रात्री सर्व गाढ़ झोपेत असतांना रात्री 11 वाजता चे सुमारास घराला आग लागली त्यात 1 स्कूटी, 3 सायकल, टेबल खुर्ची, तनिस, आणि इत्तर साहित्य जळून खाक झाले.छपरात झोपलेल्याना आग लागल्याचे कळताच त्यांनी शेजा-याना जागवले व मिळून आग विझविन्यात आली.
सकाळीच घटनेची माहिती आमगांव तालुका प्रशासनीला दिल्यानंतर नायब तहसीलदार नीगपुरे, तलाठी डोये, जि.प. जियालाल पंधरे, घटना स्थळी पोहचले व पंचनामा करून घेतला. यावेळी सरपंच भलावी, माजी सरपंच चौधरी, ग्रा.प. सदस्य व गiवकरी उपस्थित होते.