गोपाळ समाजाची निवडनुक चिंतन बैठक रिसोड येथे उत्साहात

0
21
प्रातिनिधत्वाच्या मुद्द्यावर सर्व संघटना झाल्या एकसंघ
*रिसोड(राम धनगर),दि.19:* स्वातंत्र्याची सत्तरी उलटल्यानंतरही भटकंती अवस्थेत जीवन जगणारा भारतातील बहुसंख्य गोपाळ समाज अजूनही प्रतीनिधीत्वापासून वंचित असून प्रचलीत व्यवस्थेने आजवर या समाजाचा केवळ मतासाठीच वापर करून बहुसंख्य असून सुध्दा अजूनही विधिमंडळात समाजाचे प्रतिनिधित्व नाही ही खंत मनाशी बाळगुण एक झेंडा एक अजेंडा या गोपाळ समाजाच्या वर्तमान चळवळीतील ब्रीदावली प्रमाणे महाराष्ट्रासह सकल भारत वर्षातील गोपाळ समाज ,एकसंघ झाला असून आगामी विधानसभा निवडनुकीमध्ये महाराष्ट्रातील गोपाळांचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव विधानसभा क्षेत्रातून समाजातील प्रख्यात उद्योजक संजय गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान रिसोड येथे दिनांक १७ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या निवडनुक चिंतन बैठकी मध्ये राज्यभरातुन गोपाळ समाज बांधवांची उपस्थिती होती. गोपाळ समाजाच्या ईतीहासात प्रथमच सर्व संघटनाणी एकत्र येत एकजुटीचा नारा दिला. यावेळी पूलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. गोपाळ समाजाच्या विकासासाठी वर्तमान आणि तत्कालीन चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समन्वय साधुन परिवर्तनाची ही चळवळ अधिक ववृंधिगत करावी असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिकराव धनगर यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले. आपल्या समाज हा अत्यंत बुद्धिमान व मेहनती असून शाहु फुले आंबेडकर यांच्या महान विचारांची समाजाला अत्यंत गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ रामकृष्ण कालापाड यांनी केले. गोपाळ समाजाला उन्नत करण्याचे माझे स्वप्न असून शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी झटेल असे भावनिक उद्गार गोपाळ समाज चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक प्रा दयाराम गव्हाणे यांनी व्यक्त केले. यावेळी नामदेवराव माळी, प्रा प्रकाश सावंत, सुभाष गव्हाणे,अशोक जाधव घनगावकर ,युवराज पवार,भारत गव्हाणे यांनी देखील समाजाच्या आजवरच्या प्रतिनिधित्वहीन अवस्थेवर मात करण्यासाठी सकारात्मक चर्चा घडवुन आनली. दरम्यान मुंबईसारख्या महानगरात शुन्यातून विश्व निर्माण करणारे, अडीअडचणीत समाजासाठी धावून जाणारे युवा नेतृत्व संजय गव्हाणे यांच्या पाठीशी उभे राहून वंचीत गोपाळ समाजाला न्याय मिळवून देण्याचे आवाहन महाराष्ट्रातील गोपाळ समाज बांधवांनी केले आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार पवार व बालाजी घोडके यांनी केले तर आभार पज्ञानेश्वर गव्हाणे यांनी केले या कार्यक्रमाला रीसोड मालेगाव मतदारसंघासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील समाज बांधवांची उपस्थिती होती.