सालेकसा,दि.20 वर्तमान काळात समाजापासून इतिहास कोसो दूर राहिलेला आहे. इतिहासावरच आपले भवितव्य अवलंबून असते, त्यामुळे आपला खरा इतिहास समाजाला कळणे काळाची गरज आहे.त्याचबरोबर समाजाने अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे. कारण विकासात खरा अडथळा अंधश्रध्देने निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केदान नाकाडे यांनी केले.ते कुणबी महासंघ सालेकसाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून बोलत होते. समाज एकछत्राखाली कसा येईल यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने चिंतनात्मक कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने समाज उन्नतीसाठी कार्य करावे असे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती सौ. लताताई दोनोडे यांनी केले. त्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. समाज बांधवांनी समाज बळकट करण्यासाठी एकत्रित येऊन समाजाची ताकद दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर समाज विकासावर ते प्रत्येकाने समोर येणे काळाची गरज आहे असे वक्तव्य माजी जि.प. अध्यक्ष सौ. उषा मेंढे यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष दिपक बहेकार, प. स.सदस्या जयाताई डोये, देवरी प.स.सभापती सुनंदा बहेकार, नगरपंचायतचे उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष वासुदेव चुटे, तालुका भाजपा मंडलचे अध्यक्ष परसराम फुंडे, तालुका राष्टवादी कांग्रेसचे अध्यक्ष तुकाराम बोहरे, वनपाल पुरुषोत्तमजी मेंढे, एस.ए.घुघे, डॉ. संजय देशमुख, वासुदेव फुंडे, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, अनिल फुंडे, देवराम चुटे,सालेकसा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष मनोज डोये, पृथ्वीराज शिवनकर, अरविंद फुंडे, देवेंद्र बहेकार आदी मान्यवर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अतिथींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जयंती महोत्सवात 16 फेब्रुवiरी पासूनच प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा, मॅरेथॉन दौड स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आणि 19 रोजी भव्य रॅलीचे आयोजन असं विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा. संजय बारसे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन पवन पाथोडे यांनी केले.उपस्थितांचे आभार मनोज डोये यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणबी महासंघ व महिला कुणबी महासंघ तसेच समस्त बहुजन बांधवांनी कार्यक्रमासाठी खूप खूप परिश्रम घेतले.





