तिरोड्यात शनिवारी मुख्यमंत्री करणार विविध कामांचे भूमिपूजन

0
13

तिरोडा,दि.20: तिरोडा-ग़ोरेगाव विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवार (दि.२३) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येथील जि.प.कन्या शाळा तिरोड्याच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता आयोजित या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुडे, आमदार परिणय फुके, माजी आमदार हेमंत पटले, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे व गोरेगाव नगराध्यक्ष आशिष बारेवार आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील यावेळी धापेवाडा उपसा qसचन टप्पा-२ बोलदकसा चोरखमारा पाईपलाईन (जलवाहिनी) व पंप हाऊसचे भूमिपूजन किंमत २७५ कोटी रुपये यामुळे २७८०० हेक्टर कृषीभुमीचे सिंचन होणार आहे.धापेवाडा उपसा qसचन टप्पा-१ अंतर्गत खळबंदा जलाशयात पाईपलाईनद्वारे सोडलेल्या पाण्याचे पूजन लाभक्षेत्र १०७०० हेक्टर कृषी भूमी सिंचीत होणार, बाम्पेवाडा (एकोडी)-वडेगाव-तिरोडा ते खैरलांजी रस्ता बांधकाम भूमिपूजन केंद्रीय महामार्ग रस्ता निधी ११० कोटी, तिरोडा-रामटेक-मनसर रस्ता बांधकाम भूमिपूजन-केंद्रीय महामार्ग रस्ता निधी २५० कोटी माडगी पुलापासून ते तिरोडा आयटीआय पर्यंत तिरोडा फेस, गोंदिया-गोरेगाव कोहमारा रस्ते बांधकामाचे भूमिपूजन ११८ कोटी, तिरोडा शहर पाणीपुरवठा योजना नुतनीकरण व नवीनीकरण भूमिपूजन-२७ कोटी, तिरोडा नगर परिषद अंतर्गत रस्ते बांधकामाचे भूमिपूजन १६ कोटी, गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत रस्ते बांधकामाचे भूमिपूजन १० कोटी आदिंचा समावेश असल्याची माहिती आमदार विजय रहांगडाले यांनी दिली आहे. मतदार संघातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ही केले आहे.