शिक्षणाला महत्व देत संस्कृतीचे रक्षण करा-मुरलीधर टेंभरे

0
10

सडक-अर्जुनी,दि.20: तालुक्यातील डुंडा येथे क्षत्रिय पोवार समाज संघटनेच्यावतीने चक्रवती राजाभोज जयंती आणि राजाभोज यांच्या पुतळ्याचे अनावरण १३ फेबु्रवारी रोजी करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभेचे अध्यक्ष मुरलीधर टेंभरे यांनी आजच्या काळात शिक्षण महत्वाचे असून आपला समाज पाहिजे त्या प्रमाणात शिक्षणात पुढे गेलेला नाही. आपल्या मुला-बाळांना प्रशासकीय सत्तेतील अधिकारी होण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज आहे. त्यामुळे समाज बंधू-भगिनींनी आपल्या मुलाबाळांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देत आपली पोवारी संस्कृती, बोली व भाषेला कसे टिकविता येईल यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभेचे अध्यक्ष मुरलीधर टेंभरे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पोवार क्षत्रीय महासभेचे उपाध्यक्ष मोतीलाल चौधरी, अशोक बिसेन, कोषाध्यक्ष रमेश टेंभरे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष लिलेश रहांगडाले, चेतन भैरम, पृथ्वीराज रहांगडाले, जनसंवाद सचिव प्रा. संजीव रहांगडाले, दिलीप रहांगडाले, गोरेगाव न.प. उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन, पोलीस पाटील नोकराम येडे, मधुकर ठाकरे, देवानंद टेंभरे, कुणाल बिसेन आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राजाभोज यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमकृष्ण पटले यांनी केले. संचालन टिकेश ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोवार समाजबांधवांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.