मिशन अधिकारी केंद्रात गाडगे महाराज व शिवाजी महाराजांची जयंती साजरी

0
34
लाखांदुर,दि.24:तालुक्यातील मिशन अधिकारी स्पर्धा परीक्षा केंद्र च्या वतीने गाडगे महाराज व शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती २३ फेब्रुवारीला साजरी करण्यात आली.यावेळी गाडगे महाराज व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करूण जयंती साजरी करण्यात आली. सोबतच नुकताच काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.
यावेळी केंद्रातील विद्यार्थ्यांनी गाडगे महाराज व शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुन लाभलेल्या शितल मेश्राम यांनी गाडगे महाराज व शिवाजी महाराज यांच्या बालपण व जीवनावर प्रकाश टाकला. सोबतच महापुरूषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी यशाचे ऊंच शिखर गाठावे असे प्रतीपादन केले.कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन गौरव डोंगर् यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रियंका भोवते, किरण मेश्राम, अंजली हुमण्, स्नेहल दिवठे , श्रीकांत लुटे , अमित मेंढे,  आकाश चौबे, शिवम रामटेके, प्रविण रंगारी व इतर विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.