शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सदैव कटिबद्ध :-खा.अशोक नेते

0
20

सावली,दि.24ःः बाजार समिती च्या माध्यमातून सरकारनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या आहे त्या योजनांचा लाभ शेवटचा शेतकऱ्या पर्यंत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे तसेच मार्केट यार्ड सुरू करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे कार्य या प्रशासक मंडळाचे कौतुकास्पद असल्याचे जिल्हा परिषद चे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी म्हटले. तर शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र सरकार ही शेतकऱ्यांचा भक्कम पणे पाठीशी असल्याचे खासदार अशोक नेते यांनी म्हटले.
सावली येथे दि,२३ फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या कार्यालय व गोडाऊन लोकार्पण सोहळा खासदार अशोक नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा हस्ते पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम पुलवामा येथे शाहिद झालेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नंतर सभागृहाचे लोकार्पण व शेतकरी बांधवांना शासकीय योजनेची माहिती मान्यवरांनी दिली.

कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली-चिमुर क्षेत्राचे खासदार अशोक नेते, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. स्वागताध्यक्ष म्हणून बाजार समिती चे अध्यक्ष अविनाश पाल ,जी.प.बांधकाम वित्त सभापती संतोष तंगडपल्लीवार,जी.प सदस्य योगीताताई डबले, मनीषाताई चिमुरकर, प.स उपसभापती. तुकाराम ठिकरे,भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवरावजी मुद्दमवार,प.स.सदस्य रवींद्र बोलीवार,तथा सर्व बाजार समितीचे संचालक मंडळ भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पाल यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम झाडे यांनी तर आभार अर्जुन भोयर यांनी मानले.कार्यक्रमाला तालुक्यातील व्यापारी, अडते,मापारी,पत्रकार तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.